नारायणाय ऋषये, पुरुषाय महात्मने ।
विश्वेश्वराय विश्वाय, सर्वभूतात्मने नमः ॥३०॥
'नारायणा' ऋषिवरा । 'महापुरुषा' सुरेंद्रा ।
'विश्र्वरूपा' विश्र्वेश्र्वरा' । महात्म्या श्रीवरा नमन तुज ॥३८॥
'सर्व भूतीं तूं भूतात्मा' । तुज नमो पुरुषोत्तमा ।
द्वापरीं ऐशिया नामां । नृपोत्तमा सदा स्मरती ॥३९॥
त्या नामांच्या पाठा । तेणें देवासी संतोष मोठा ।
वेगीं सांडोनि वैकुंठा । धावे अवचटा कीर्तनामाजीं ॥३४०॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.