पुरुषत्वे च मां धीराः साङ्ख्ययोगविशारदाः ।
आविस्तरां प्रपश्यन्ति सर्वशक्त्युपबृंहितम् ॥२१॥
एवं वैराग्यें पूर्ण भरित । धीर पुरुष विवेकयुक्त ।
सांख्ययोग विवंचित । निजीं निज प्राप्त तत्काळ ॥३९॥
नरदेहीं विवेक वसे । निजरूप पावले कैसे ।
जें सर्वशक्तियुक्त असे । तें सावकाशें देखती ॥२४०॥
जें प्रसवे सर्वशक्तींतें । तें सर्वशक्ति शक्तिदातें ।
जें नातळे सर्वशक्तीतें । त्या स्वरूपातें पाहताती ॥४१॥
उद्धवा काय सांगों गोष्टी । बहुत शरीरें सृजिलीं सृष्टीं ।
मज नरदेहीं आवडी मोटी । उठाउठीं मी होतों ॥४२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.