श्रीयदूरुवाच ।
कुतो बुद्धिरियं ब्रह्मन्नकर्तूः सुविशारदा ।
यामासाद्य भवाल्लोकं विद्वांश्चरति बालवत् ॥२६॥
अपूर्व बुद्धि हे स्वामी । तूमचे ठायीं देखों आम्ही ।
जे न लभे यमनियमीं । कर्मधर्मीं आचरतां ॥७८॥
दिसतोसी सर्वार्थी कुशळ । परी कांही न करूनि निश्चळ ।
अकर्तात्मबोधें तूं केवळ । जैसें बाळ अहेतूक ॥७९॥
तूं बालाऐसा वर्तसी । परी बालबुद्धि नाहीं तूजपासीं ।
सर्वज्ञ सर्वथा होसी । ऐसें आम्हांसी दिसतसे ॥२८०॥
येवोनियां या लोकासी । पावोनियां नरदेहासी ।
सार्थकता तूझ्याऐसी । आणिकापाशीं न देखों ॥८१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.