त्वं तू कल्पः कविर्दक्षः सुभगोऽमृतभाषणः ।

न कर्ता नेहसे किञ्चिज्जडोन्मत्तपिशाचवत् ॥२८॥

सर्वज्ञज्ञाता तूं होसी । तें ज्ञातपण दिसों न देसी ।

कांहीं करिसी ना वांछिसी । जडत्वें दाविसी निजशांती ॥३००॥

सर्वथा उगा अससी । परी तूं अंगें विकळ नव्हसी ।

अंगीं अव्यंगु दिसतोसी । स्वरूपरूपेंसीं शोभितू ॥१॥

ज्ञान एकलेपणें ठेलें । दूजेनिवीण परदेशी झालें ।

तें तूजमाजीं सामावलें । यालागीं आलें कविपद ॥२॥

करूनि झालासी अकर्ता । हेचि तूझी थिर दक्षता ।

ब्रह्मरसें रसाळ बोलतां । चवी अमृता ते कैंची ॥३॥

ब्रह्मरस तू प्यालासी । ब्रह्मानंदें मातलासी ।

जगीं उन्मत्त झालासी । दृष्टीं नाणिसी कोणातें ॥४॥

सदा सावध निजरूपेंसी । यालागीं माझें तूझें न म्हणसी ।

तेंचि पिसेंपण तूजपाशीं । दिसे जगासी सर्वथा ॥५॥

निजबोधें तृप्त झालासी । परमानंदें निवालासी ।

तीं हीं लक्षणें तूजपासीं । निर्धारेंसीं दिसताती ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel