यतो यदनुशिक्षामि यथा वा नाहुषात्मज ।
तं त्तथा पुरुषव्याघ्र निबोध कथयामि ते ॥३६॥
नहुषाचा पुत्र ययाती । ययातीचा यदू निश्चितीं ।
नहुषनंदन यदूसी म्हणती । मूळ व्युत्पत्ती तेणें योगें ॥५५॥
यालागीं म्हणे नाहुषनंदना । पुरुषांमाजीं पंचानना ।
सांगेन गुरूंच्या लक्षणा । विचक्षणा परियेसीं ॥५६॥
ज्या गुरूचें जें शिक्षित । मी शिकलों सुनिश्चित ।
तें ते सांगेन समस्त । सावध चित्त करीं राया ॥५७॥
ऐकावया गुरुलक्षण । यदूनें सर्वांग केलें श्रवण ।
अर्थीं बुडवूनियां मन । सावधान परिसतु ॥५८॥
शब्द सांडोनियां मागें । शब्दार्थामाजीं रिगे ।
जें जें परिसतू तें तें होय अंगें । विकल्पत्यागें विनीतु ॥५९॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.