बुध्यते स्वेन भेदेन व्यक्तिस्थ इव तद्गतः ।

लक्ष्यते स्थूलमतिभिरात्मा चावस्थितोऽर्कवत् ॥५१॥

सूर्यो थिल्लरामाजीं बिंबला । मूढ म्हणती थिल्लरीं बुडाला ।

त्याचेनि कंपें कंपु मानिला । डहुळें डहुळला म्हणती तो ॥३९॥

त्या थिल्लरातें नातळतां । गगनीं अलिप्त जेवीं सविता ।

तैसीच योगियांची योग्यता । देहातीतता देहकर्मीं ॥५४०॥

त्यासी देहबुद्धीचेनि छंदें । म्हणती योगिया देहीं नांदे ।

त्या देहाचेनि नाना बाधें । स्वबुद्धिभेदें बांधिला म्हणती ॥४१॥

त्यासी देहाचें बाधित भान । हें न कळें त्याचें गुह्यज्ञान ।

दोराचेनि सापें जाण । डसोनि कोण मारिला ॥४२॥

एवं आत्मा तो चिदाकाशीं । मिथ्या देहीं मिथ्यात्वेंसीं ।

बिंबोनि दावी देहकर्मासी । नव्हे तें त्यासी बाधक ॥४३॥

देखे आपणातें जळीं बिंबला । परी न म्हणे मी जळीं बुडाला ।

तैसा देहातीतु बोधू झाला । नाहीं भ्याला देहकर्मा ॥४४॥

देखोनि मृगजळाचा पूरु । मूर्ख करूं धांवती तारूं ।

तैसा मिथ्या हा संसारू । भयंकरू मूर्खासी ॥४५॥

यालागीं दारागृहपुत्रप्राप्ती । तेथ न करावी अतिप्रीती ।

येचिविषयीं रायाप्रती । कथा कापोती सांगतु ॥४६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel