नातिस्नेहः प्रसङ्गो वा कर्तव्यः क्वापि केनचित् ।

कुर्वन्विन्देत सन्तापं कपोत इव दीनधीः ॥५२॥

संसारदुःखाचें मूळ । स्त्रीआसक्तीच जाण केवळ ।

स्त्रीलोभाचें जेथ प्रबळ बळ । दुःख सकळ त्यापासीं ॥४७॥

स्त्रीपासाव झाले पुत्र । त्याचे ठायीं स्नेह विचित्र ।

करितां दुःखासी पात्र । संसारी नर होताती ॥४८॥

आसक्ति आणि स्नेहसूत्र । या दोन्हीपासाव दुःख विचित्र ।

पदोपदीं भोगिती नर । अस्वतंत्र होऊनि ॥४९॥

यालागीं भलतेनि भलते ठायीं । आसक्ति स्नेहो न करावा पाहीं ।

अतिस्नेहो मांडिजे जिंहीं । दुःख तिंही भोगिजे ॥५५०॥

स्नेहदुःखाची वार्ता । कपोताकपोतीची कथा ।

तूज सांगेन नृपनाथा । स्वस्थचित्ता परियेसीं ॥५१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel