अथ बद्धस्य मुक्तस्य वैलक्षण्यं वदामि ते ।
विरुद्धधर्मिणोस्तात स्थितयोरेकधर्मिणि ॥५॥
येणेंचि प्रसंगें जाण । मागील तुझे जे प्रश्न ।
बद्धमुक्तांचे लक्षण । तेहीं निरूपण सांगेन ॥५४॥
दोघांही देहीं असतां । दिसे विरुद्ध धर्म स्वभावतां ।
एक तो सदा सुखी सर्वथा । एक दुःखभोक्ता अहर्निशीं ॥५५॥
येथ विलक्षणता दों प्रकारीं । एक ते जीव ईश्वरामाझारीं ।
एक ते जीवांसी परस्परी । बद्ध मुक्त निर्धारीं निर्धास्त ॥५६॥
पहिली जीवेश्वरांची कथा । तुज मी सांगेन विलक्षणता ।
मग जीवाची बद्धमुक्तता । विशद व्यवस्था सांगेन ॥५७॥
जीवेश्वरांचें वैलक्षण्य । अडीच श्लोकीं निरूपण ।
स्वयें सांगताहे नारायण । भाग्य पूर्ण उद्धवाचें ॥५८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.