इति मे छिन्नसंदेहा मुनयः सनकादयः ।
सभाजयित्वा परया भक्त्यागृणत संस्तवैः ॥४१॥
आत्मज्ञानी परम दक्ष । मुमुक्षुंमाजीं अतिनेटक ।
संदेहापन्न सनकादिक । म्यां यापरी देख निःसंदेह केले ॥३८॥
सदा सावधानें निर्मळ । माझ्या भजनीं अतिप्रेमळ ।
सदा मद्रूपें मननशीळ । अव्याकुळ श्रवणार्थी ॥३९॥
उद्धवा तिंहीं ऐकतां माझी गोष्टी । माझ्या स्वरूपीं घातली मिठी ।
मद्रूप झाले उठाउठी । बाप जगजेठी ब्रह्मपुत्र ॥७४०॥
तिंहीं दृश्य द्रष्टा दर्शन । त्रिपटीचें केलें शून्य ।
परब्रह्मचि झाले पूर्ण । माझेनि जाण उपदेशें ॥४१॥
परम पावले समाधान । गद्यपद्यादि सुलक्षण ।
माझें करोनियां स्तवन । पूजाविधान मांडिलें ॥४२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.