यदा मन उपादाय यद्यद्रूपं बुभूषति ।
तत्तद् भवेन्मनोरूपं मद्योगबलमाश्रयः ॥२२॥
पहिली मनोजवधारणा । त्याहीवरी माझी भावना ।
अचिंत्य सामर्थ्य माझें जाणा । अनुसंधाना जो आणी ॥१९॥
मी नाना रूपांतें धरिता । सवेंचि रूपांतरें विसर्जिता ।
ऐशी माझी संपूर्ण सत्ता । ते त्याच्या हाता पैं लाभे ॥१२०॥
एवं माझिया दृढ धारणा । माझें सामर्थ्य ये त्याच्या मना ।
मग ज्या रूपाची करी भावना । तद्रूप जाणा स्वयें होय ॥२१॥
सुरनरपन्नगांमाजीं जें जें रूप । धरावया करी जो संकल्प ।
तो तत्काळ गा मद्रूप । हे कामरूप सिद्धी माझी ॥२२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.