उच्चैःश्रवास्तुरङ्गाणां धातूनामस्मि काञ्चनम् ।
यमः संयमतां चाहं सर्पाणामस्मि वासुकिः ॥१८॥
नागेन्द्राणामनन्तोऽहं मृगेन्द्रः शृङ्गिदंष्ट्रिणाम् ।
आश्रमाणामहं तुर्यो वर्णानां प्रथमोऽनघ ॥१९॥
उच्चैःश्रवा तुरंगजाती । तो मी म्हणे कमळापती ।
सुवर्ण धातु माझी विभूती । जीलागीं लुलाती तिनी लोक ॥८८॥
दंडधारित्यांमाजी गहन । यमधर्म मी आपण ।
सर्पामाजी जाण । मी नारायाण वासुकी ॥८९॥
अनंत या नामातें जो धरी । तो नाग मी म्हणे श्रीहरी ।
नखदंष्ट्राशृंगधारी । त्यांमाजीं केसरी म्हणे देवो ॥१९०॥
चतुर्थाश्रम संन्यास जाण । तो मी म्हणे नारायण ।
वर्णाग्रज जे ब्राह्मण । ते मी ब्रह्म जाणे बोलतें ॥९१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.