योगानामात्मसंरोधो मन्त्रोऽस्मि विजिगीषताम् ।
आन्वीक्षिकी कौशलानां विकल्पः ख्यातिवादिनाम् ॥२४॥
विविध योगांमाजीं आत्मरोधू । तो योग मी म्हणे गोविंदू ।
जेणें प्रकटे परमानंदू । समाधिबोधू साधकां ॥३॥
मुख्यत्वें विवेक धरोनि हातीं । जो न्यायतां विजयो वांछी चित्तीं ।
ते नीतीची नीति मी श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४॥
आत्मानात्मविवेक केवळ । ते आन्वीक्षिकी विद्या कुशळ ।
ते विद्या म्हणे मी गोपाळ । विवेक प्रबळ माझेनी ॥५॥
वादांमाजी वाद अनंत । जेथ विकल्पा नाही अंत ।
तो वादू मी म्हणे अच्युत । ऐक निश्चित विकल्प ॥६॥
आख्याती अन्यथाख्याती । शून्यख्याती सत्ख्याती ।
अनिर्वचनीय जे ख्याती । तो वादू निश्चितीं मी उद्धवा ॥७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.