विश्वावसुः पूर्वचित्तिर्गन्धर्वाप्सरसामहम् ।
भूधराणामहं स्थैर्यं गन्धमात्रमहं भुवः ॥३३॥
ज्याचें गायन अतिअपूर्व । जो विश्वावसु गंधर्व ।
तो मी म्हणे माधव । ऐके उद्धव सावध ॥५८॥
नृत्य करूनि मनोहरा । सबाह्य सद्भावें सुंदरा ।
पूर्वचित्ती जे अप्सरा । ते मी म्हणे नोवरा भीमकीचा ॥५९॥
पर्वतांमाजीं जें 'स्थैर्यपण' । तें मी म्हणे नारायण ।
पृथ्वीमाजीं जो 'गंध' जाण । तो मी श्रीकृष्ण स्वयें म्हणे ॥२६०॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.