पृथिवी वायुराकाश आपो ज्योतिरहं महान् ।
विकारः पुरुषोऽव्यक्तं रजः सत्त्वं तमः परम् ॥३७॥
तत्त्वसंख्या पंचवीस । त्रिगुण घालितां अठ्ठावीस ।
ऐक त्यांचाही विलास । सावकाश सांगेन ॥७३॥
अहं महतत्त्व पंचतन्मात्रा । हा स्थूल प्रकृतीचा उभारा ।
महाभूतेंद्रियें अकरा । हे षोडश विकारांची संख्या ॥७४॥
यांत मिळाल्या प्रकृति-पुरुष । तत्त्वसंख्या पंचवीस ।
प्रकृतीमाजीं गुणांचा वास । हा तत्त्वविलास तत्त्वांचा ॥७५॥
प्रकृति गुणविकार । तत्त्वसंख्या निर्धार ।
हा म्यां सांगितला जो विचार । तें परात्पर स्वरूप माझें ॥७६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.