तेजः श्रीः कीर्तिरैश्वर्यं ह्रीस्त्यागः सौभगं भगः ।

वीर्यं तितिक्षा विज्ञानं यत्र यत्र स मेऽंशकः ॥४०॥

ज्याची प्रबळ प्रतापशक्ती । जेथ निरंतर लक्ष्मीची वस्ती ।

ज्यासी मर्यादा नाहीं संपत्ती । ज्याची उदारकीर्ति स्वधर्में ॥८७॥

ज्याच्या ऐश्वर्याची परमगती । आज्ञेवरी नेमी त्रिजगती ।

ज्याची अनावर दानस्थिती । जेथे भाग्याची उत्पत्ती नीच नवी दिसे ॥८८॥

ज्याचें सामर्थ्य अतिदुर्धर । कोणी बोलों शकेना उत्तर ।

ज्याचें सौभाग्य मनोहर । आल्हादकर जननयनां ॥८९॥

ज्यासी सहनशीळतेची वोज । ज्यासी निंद्य कर्माची लाज ।

जो विज्ञानाचें भोज । सहजेंचि निज नाचत ॥२९०॥

इयें लक्षणें जेथ वर्तती । ते जाण माझी विभूती ।

यांत एका लक्षणाची जेथ प्राप्ती । तेही विभूती पैं माझी ॥९१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel