यथाऽनुष्ठीयमानेन त्वयि भक्तिर्नृणां भवेत् ।
स्वधर्मेणाऽरविन्दाक्ष तत्समाख्यातुमर्हसि ॥२॥
ऐके कमलनयना अच्युता । जो कां स्वधर्म अनुष्ठितां ।
तुझी निजभक्ती स्वभावतां । प्राण्याच्या हाता जेणें लाभे ॥२२॥
ते कर्मकुशलतेची स्थिती । मजलागीं सांगावी सुनिश्चितीं ।
कमलनयना कमलापती । कृपामूर्ती माधवा ॥२३॥
तूं ऐसें म्हणशील श्रीपती । `म्यां कल्पाचे आधीं कवणाप्रती ।
सांगितली स्वधर्मस्थिती' । तरी ते विनंती अवधारीं ॥२४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.