विप्रक्षत्रियविट्शूद्रा मुखबाहूरुपादजाः ।
वैराचात्पुरुषाज्जाता य आत्माचारलक्षणाः ॥१३॥
वैराजपुरुषापासाव जाण । मुखीं उपजले `ब्राह्मण' ।
बाहूपासूनि `राजन्य' । ऊरु जन्मस्थान `वैश्यांचें' ॥७६॥
`शूद्र' चरणीं जन्मले जाण । यापरी जाहले चारी वर्ण ।
यांचें ऐक मुख्य लक्षण । स्वधर्माचरण सर्वांशीं ॥७७॥
चतुर्वर्णांची उत्पत्ती । वैराज पुरुषापासूनि या रीतीं ।
आतां आश्रमांची स्थिती । ऐक निश्चितीं सांगेन ॥७८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.