रेतो नावकिरेज्जातु ब्रह्मव्रतधरः स्वयम् ।
अवकीर्णेऽवगाह्याप्सु यतासुस्त्रिपदीं जपेत् ॥२५॥
या रीतीं ब्रह्मचारीं देख । वीर्यत्याग बुद्धिपूर्वक ।
करूं नये आवश्यक । व्रतविशेष ब्रह्मचर्य ॥८८॥
स्वप्नीं जाहल्या वीर्यपतन । शास्त्रोक्तविधीं करावें स्नान ।
मग प्रायश्चित्तार्थ जाण । गायत्रीस्मरण करावें ॥८९॥
ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्यासी । प्रयत्नें वीर्यत्यागु नाहीं त्यांसी ।
जो करी तो अतिदोषी । आश्रमधर्मासी बुडविलें ॥२९०॥
स्वप्नीं जाहलिया वीर्यपतन । करावें मृत्तिका सचैल स्नान ।
मग प्रायश्चित्तार्थ जाण । विहिताचरण जप किजे ॥९१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.