सर्वाश्रमप्रयुक्तोऽयं नियमः कुलनंदन ।
मद्भावः सर्वभूतेषु मनोवाक्कायसंयमः ॥३५॥
यदुवंशकुलनंदना । ऐक उद्धवा सज्ञाना ।
वर्णाश्रमस्वधर्मलक्षणा । सर्वांस जाणा हे एकी निष्ठा ॥५९॥
मनसा वाचा कर्मणा । नेमूनि आपआपणा ।
सर्वांभूतीं ब्रह्मभावना । अखंड धारणा राखावी ॥३६०॥
ऐसा मद्भाव सार्वांभूतीं । दृढ ठसावल्या चित्तवृत्ती ।
ऐशा नैष्ठिक ब्रह्मचार्याप्रती । मोक्षफलप्राप्ती हरि बोले ॥६१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.