पुत्रदाराप्तबन्धूनां सङ्गमः पान्थसङ्गमः ।
अनुदेहं वियन्त्येते स्वप्नो निद्रानुगो यथा ॥५३॥
जैसे वृक्षातळीं पांथिक । एकत्र मीनले क्षण एक ।
तैसे पुत्रदाराप्तलोक । सर्वही क्षणिक संगम ॥९८॥
उभय नदीप्रवाहेंसीं । काष्ठें मीनलीं संगमीं जैसीं ।
सोयरीं सर्व जाण तैसीं । हेलाव्यासरसीं फांकती ॥९९॥
जे योनीं जो जीव देहधारी । तेथें तेचि योनींचीं सोयरीं ।
ऐशीं अनंत जन्में संसारीं । तैं अमित सोयरीं जीवाचीं ॥५००॥
परी ये योनीचीं ते योन्यंतरीं । येरयेरां नोळखती सोयरीं ।
जैसी ये स्वप्नींची पदार्थपरी । त्या स्वप्नांतरीं रिघेना ॥१॥
यापरी हे समस्त । स्त्री पुत्र बंधु आप्त ।
मायामय कल्पित । जाणें निश्चित तो धन्य ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.