गुणदोषभिदादृष्टिर्निगमात्ते न हि स्वतः ।
निगमे नापवादश्च, भिदाया इति ह भ्रमः ॥५॥
एवं नानागुणदोषदृष्टीं । तुझेनि वेदें वाढविली सृष्टी ।
स्वतां पुरुषाचे पोटीं । गुणदोषदृष्टी असेना ॥६॥
तुझ्या वेदानुवादविस्तरें । गुणदोष झाले खरे ।
ते तुझेनिही बलात्कारें । चित्ताबाहेरें न निघती ॥६१॥
अनादि वेद प्रमाण । हें तुझें मुख्य वेदवचन ।
आतां न देखावे दोषगुण । हें नवें वचन मानेना ॥६२॥
पहिले प्रकाशिले दोषगुण । आतां निवारावया काय कारण ।
हें न कळतां संपूर्ण । भ्रमित मन होतसे ॥६३॥
या भ्रमाची भ्रमनिवृत्ती । कृपेनें करावि कृपामूर्ती ।
ऐकोनि उद्धवाची वचनोक्ती । काय श्रीपती बोलिला ॥६४॥
ऐकोनि उद्धवाची विनंती । योगत्रयाची उपपत्ती ।
अधिकारभेदें वेदार्थप्राप्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥६५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.