यदारम्भेषु निर्विण्णो, विरक्तः संयतेन्द्रियः ।
अभ्यासेनात्मनो योगी, धारयेदचलं मनः ॥१८॥
जो कर्मारंभींच विरक्त । फळाशा नातळे ज्याचें चित्त ।
मज निजमोक्ष व्हावा येथ । हेंही पोटांत स्मरेना ॥९६॥
खडतर वैराग्याची दृष्टी । इंद्रियांसी विषयांची गोष्टी ।
करुंचि नेदी महाहटी । धारणा नेहटीं दृढ राखे ॥९७॥
करुनियां श्रवण मनन । माझ्या स्वरुपाचें अनुसंधान ।
अखंड करी निदिध्यासन । तिळभरी मन ढळों नेदी ॥९८॥
धरोनि धारणेचें बळ । स्वरुपीं मन अचंचळ ।
अणुभरी होऊं नेदी विकळ । राखे निश्चळ निजबोधें ॥९९॥
एकाकी मन पाहें । स्वरुपीं कैसें निश्चळ होये ।
त्या अभ्यासाचे उपाये । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ॥२००॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.