इष्द्वेह देवता यज्ञैर्गत्वा रंस्यामहे दिवि ।
तस्यान्त इह भूयास्म महाशाला महाकुलाः ॥३३॥
जे कर्मभूमीसी मनुष्य झाले । ते सहजें मोक्षाधिकारा आले ।
तेथही कामना नागविले । स्वर्गार्थ भजले देवतांतरा ॥३६॥
स्वर्गभोगीं ठेवूनि मन । नाना यागीं करिती यजन ।
तेणें दिविभोग पावेन । हा निश्चिय जाण याज्ञिकां ॥३७॥
काळें भोगक्षयाच्या पतनीं । तेही घेती हितत्वें मानोनी ।
सवेंचि इहलोकीं जन्मोनी । ब्राह्मणपणीं सुशील ॥३८॥
वेदवेदांगअध्ययन । धनधान्यें अतिसंपन्न ।
आम्ही विख्यात गृहस्थ होऊन । क्षीणपुण्य स्वर्गस्थ ॥३९॥
नेणोनि वेदार्थनिजस्थिती । ऐसऐशिया उपपत्तीं ।
सकामीं मानिली निश्चिती । ऊंस सांडोनि मागती कणीस त्याचें ॥३४०॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.