श्रीभगवानुवाच-युक्तयः सन्ति सर्वत्र भाषन्ते ब्राह्मणा यथा ।

मायां मदीयामुद्गृह्य वदतां किंनु दुर्घटम् ॥४॥

ज्याचेनि मतें जैसें ज्ञान । तो तैसें करी तत्त्वव्याख्यान ।

या हेतू बोलती ब्राह्मण । तें सत्य जाण उद्धवा ॥५६॥

जरी अवघीं मतें प्रमाण । तरी कां करावें मतखंडण ।

उद्धवा तूं ऐसें न म्हण । ते मी निजखूण सांगेन ॥५७॥

अघटघटित माझी माया । जे हरिहरां न ये आया ।

जे नाथिलें वाढवूनियां । लोकत्रया भुलवीत ॥५८॥

ते माया धरोनियां हातें । ऋषीश्वर निजमतें ।

जो जो जें जें बोलेल जेथें । तें तें तेथें घडे सत्य ॥५९॥

केवळ दोराचा सर्पाकार । हा श्वेत कृष्ण कीं रक्तांबर ।

ज्यासी जैसा भ्रमाकार । त्यासी साचार तो तैसा ॥६०॥

तेवीं आत्मतत्त्व एकचि जाण । अविकारी निजनिर्गुण ।

तेथ नाना तत्त्वांचें व्याख्यान । बोलती ब्राह्मण मायायोगें ॥६१॥

त्या मायेच्या मायिका व्युत्पत्ती । नाना वाग्वाद स्वमतीं ।

त्याच वादाची वादस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥६२॥

ऐसें बोलोनि श्रीकृष्णनाथ । उद्धवाप्रति साङग निरुपित ।

तत्त्वविचारणा यथार्थ । स्वयें सांगत आपण ॥६३॥;

हें पांचवे श्र्लोकींचें निरुपण । श्रीकृष्णउद्धवविवरण ।

सांगितलें तत्त्वव्याख्यान । उद्धवा जाण यथार्थ ॥६४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel