इति नाना प्रसंख्यानं तत्त्वानामृषिभिः कृतम् ।

सर्वं न्याय्यं युक्तिमत्त्वाद्विदुषां किमशोभनम् ॥२५॥

येथ सर्वज्ञ ज्ञाते होती । ते नाना मतें तत्त्वयुक्ती ।

विवंचोनियां उपपत्ती । विभागूं जाणती यथार्थें ॥२५॥

निजतत्त्व जाणावया जाण । करितां तत्त्वविवंचन ।

सर्वथा न लगे दूषण । तत्त्वें अधिकन्यून बोलतां ॥२६॥

वस्तुतां विकारांच्या ठायीं । ज्ञात्यासी बोलावया विशेष नाहीं ।

विकार ते प्रकृतीच्या ठायीं । आत्मा शुद्ध पाहीं अविकारी ॥२७॥

प्रकृतीहूनि आत्मा भिन्न । यालागीं तो अविकारी जाण ।

विकार प्रकृतीमाजीं पूर्ण । हें मुख्य लक्षण तत्त्वांचें ॥२८॥

प्रकृतीहूनि वेगळेपण । पुरुषांचें जाणावया आपण ।

यालागीं उद्धवा जाण । तत्त्वविवंचन साधावें ॥२९॥

हें ऐकोनि कृष्णवचन । उद्धव चमत्कारला जाण ।

प्रकृतिपुरुषांचें भिन्नपण । देवासी आपण पुसों पां ॥२३०॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel