उद्धव उवाच-त्वत्तः परावृत्तधियः स्वकृतैः कर्मभिः प्रभो ।

उच्चावचान् यथा देहान् गृह्वन्ति विसृजन्ति च ॥३४॥

सर्वत्र सदा संमुख गगन । त्यासी कदा न घडे विमुखपण ।

तेवीं आत्मा सबाह्य परिपूर्ण । वृत्ति विमुख जाण होय कैसी ॥७॥

जैं जाळीं बांधवे गगन । तैं अक्रिया लागे कर्मबंधन ।

वंध्यागर्भ सटवे जाण । तैसें जन्ममरण मुक्तासी ॥८॥

आत्म्यावेगळें कांहीं । रितें तंव उरलें नाहीं ।

तरी ये देहींचा ते देहीं । गमनसिद्धी पाहीं कैसेनी ॥९॥

पृथ्वी रुसोनि वोसरां राहे । आकाश पळोनि पर्‍हां जाये ।

तैं देहींचा देहांतरा पाहें । आत्मा लाहे संसरण ॥४१०॥

सात समुद्र गिळी मुंगी । ते आत्म उंचनीच योनी भोगी ।

हे अतर्क्य तर्केना मागी । भुलले योगी ये अर्थीं ॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel