स्वप्नं मनोरथं चेत्थं प्राक्तनं न स्मरत्यसौ ।

तत्र पूर्वमिवात्मानमपूर्वं चानुपश्यति ॥४०॥

स्वप्न देखत्या पुरुषासी । विसरोनि निजदेहासी ।

स्वप्नींच्या देहगेहांसी । साभिमानेंसीं वाढवी ॥५७॥

जागृतिदेहो राहिला तेथें । स्वप्नदेहो पावलों येथें ।

एवं पूर्व अपूर्व दोहींतें । न स्मरे चित्तें पुरुष जैसा ॥५८॥

जागृति आणि देखिलें स्वप्न । या दोहीं देहांसी देखता भिन्न ।

तेवीं जन्म आणि मरण । जीवासी जाण असेना ॥५९॥

एवं देहासी जन्म नाश । आत्मा नित्यमुक्त अविनाश ।

स्वप्नमनोरथविलास । तैसा बहुवस संसार ॥४६०॥

देहासी जन्म स्थिति मरण । यांसी मनचि गा कारण ।

मनःकल्पित संसार जाण । तेंचि श्रीकृष्ण सांगत ॥६१॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel