इन्द्रियायनसृष्तयेदं त्रैविध्यं भाति वस्तुनि ।

बहिरन्तर्भिदाहेतुर्जनोऽसज्जनकृद्यथा ॥४१॥

मनें कल्पिली सकळ सृष्टी । मनःकृत इंद्रियकामाठी ।

मनें वाढविली त्रिपुटी । कर्मकसवटी विभाग ॥६२॥

अधिदेव अध्यात्म अधिभूत । हें त्रैविध्य मनःकृत ।

वस्तु अखंडचि तेथ । त्रिधा भासत कल्पना ॥६३॥

जैसें भांडें कुंभार करी । तेथ नभ दिसे तदाकारीं ।

गगन सर्वथा अविकारी । तें दिसे विकारी भांडयोगें ॥६४॥

तेवीं आत्मा अविकारी नित्य शुद्ध । तेथ मनःकल्पित त्रिविध ।

नानापरींच्या त्रिपुटी विविध । वाढविला भेद तो ऐक ॥६५॥

कार्य कर्म आणि कर्ता । ध्येय ध्यान आणि ध्याता ।

ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता । या मनःकल्पिता त्रिविध ॥६६॥

अहं कोहं सोहं भेद । त्वंपद तत्पद असिपद ।

सत् चित् आणि आनंद । हेही संबंध मायिक ॥६७॥

असंताचिये निवृत्ती । संतत्व प्रतिपादी वेदोक्ती ।

जडाचिये समाप्ती । चिदत्व बोलती वस्तूसी ॥६८॥

करितां दुःखाचा छेद । वस्तूसी म्हणती परमानंद ।

एवं सच्चिदानंद । जाण प्रसिद्ध मायिक ॥६९॥

असंत मिथ्या मायिक पाहीं । तैसें तत्त्व कोण ठेवी ठायीं ।

जडासीचि ठाव नाहीं । तेथ चिदत्व कायी संपादे ॥४७०॥

जेथ नाहीं दुःखसंबंध । तेथ कोण म्हणे आनंद ।

एवं वस्तूच्या ठायीं सच्चिदानंद । मायिक संबंध या हेतू ॥७१॥

जेथ जें भासे संसारभान । त्रिगुणत्रिपुटी विंदान ।

तें सर्व मायिक मनःकृत जाण । आत्मा तो भिन्न गुणातीत ॥७२॥

आत्मा नित्य मुक्त शुद्ध बुद्ध । तेथ भासे जो त्रिविध भेद ।

तो मनःकृत गुणसंबंध । जाण प्रसिद्ध मायिक ॥७३॥

पुरुष श्रोत्रिय सदाचार । त्यासी स्त्री करी व्यभिचार ।

तेणें दोषी म्हणती भ्रतार । तैसा भेदप्रकार आत्म्यासी ॥७४॥

जेवीं स्वप्नामाजीं नर । एकला होय संसार ।

तो निद्रायोगें चमत्कार । तैसा भेदप्रकार मायिक ब्रह्मीं ॥७५॥

जडाजड देहभेद । परिच्छिन्नत्वें जीवभेद ।

हा स्वप्नप्राय मायिक बोध । आत्मा नित्य शुद्ध अद्वितीय ॥७६॥

ऐसे मायाविभेदनिष्ठ जन । त्यांसी वैराग्यसिद्धयर्थ जाण ।

काळकृत जन्ममरण । तेंचि निरुपण हरि बोले ॥७७॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel