यथाऽर्चिषां स्त्रोतसां च फलानां वा वनस्पतेः ।

तथैव सर्वभूतानां वयोऽवस्थादयः कृताः ॥४३॥

नित्य नूतन दीपज्वाळा । होतां जातां न दिसती डोळां ।

सवेग वाहतां जळकल्लोळा । यमुनाजळा न देखिजे ॥८६॥

फळ न सांडितां वृक्षदेंठ । कडवट तुरट आंबाट ।

तेचि गोड होय चोखट । ऐशी अतर्क्य अदृष्ट काळसत्ता ॥८७॥

तोचि काळ देहासरिया । नित्य नूतन लागला कैसा ।

बाल्य तारुण्य वृद्धवयसा । देहदशा पालटी ॥८८॥

मूढ कुशळ अशक्तता । अवस्था नाशीत ये अवस्था ।

तेथ ’मी तोचि’ हें तत्त्वतां । स्फुरे सर्वथा कैसेनी ॥८९॥

ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थीचें निरुपण ।

अखंड स्फूर्तीचें कारण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४९०॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel