मा स्वस्य कर्मबीजेन जायते सोऽप्यंय पुमान्‌ ।

म्रियत वाऽमरो भ्रान्त्या यथाग्निर्दारुसंयुतः ॥४५॥

देहात्मवादें देहाभिमान । जनीं वासनाबीज गहन ।

तेणें स्वसंकल्पें आपण । मानी जन्ममरणं नसतेंचि ॥५॥

तेणें देहाभिमानें आपण । अहं कर्म कर्ता क्रियाचरण ।

निष्कर्मा कर्मबंधन । अमरा जन्ममरण आरोपी ॥६॥

थिल्लराचेनि जाहलेपणें । त्यांत सूर्याचें जन्म मानणें ।

थिल्लरनाशें सूर्याचें जिणें । नासलें म्हणे बाळक ॥७॥

तेवीं अजन्म्यासी जन्मकर्म । मानिती तो मायिक भ्रम ।

येचिविषयीं पुरुषोत्तम । दृष्टांत सुगम सांगत ॥८॥

जैसा अग्नि अजन्मा अव्यक्त । त्यासी काष्ठीं जन्मला म्हणत ।

दिसे काष्ठाकारें आकारवंत । काष्ठनाशें मानीत नाश त्यासी ॥९॥

येथ देहासीच जन्मनाश । आत्मा नित्य अविनाश ।

देहअवस्था नवविलास । स्वयें हृषीकेश सांगत ॥५१०॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel