प्रकृतेरेवमात्मानमविविच्याबुधः पुमान् ।
तत्त्वेन स्पर्शसंमूढः संसारं प्रतिपद्यते ॥५०॥
कर्माकर्मकर्तेपण । आत्म्यासी सर्वथा नाहीं जाण ।
येचि अर्थीचें निरुपण । मागां संपूर्ण सांगीतलें ॥५९०॥
आत्मा नातळे तिन्ही गुण । देही देहातीत जाण ।
प्रकृतीहून पुरुष भिन्न । हें निजात्मज्ञान जो नेणे ॥९१॥
तोचि संसाराचा आपण । घरजांवई झाला जाण ।
देहाभिमानासी संपूर्ण । एकात्मपण मांडिलें ॥९२॥
विषयभोग तोचि पुरुषार्थ । ऐसें मानूनियां निश्चित ।
शुभाशुभ कर्मी येथ । भोगवीत नाना योनी ॥९३॥
विषयभोग अभिमानें जाण । पुढती जन्म पुढती मरण ।
नाना योनीं आवर्तन । देहाभिमान भोगवी ॥९४॥
तें नाना योनीं गर्भदुःख । देहाभिमानें भोगिती मूर्ख ।
तेंचि नाना तत्त्वांचें रुपक । यदुनायक सांगत ॥९५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.