प्रायेणार्थाः कदर्याणां न सुखाय कदाचन ।

इह चात्मोपतापाय मृतस्य नरकाय च ॥१५॥

प्रायशा जे धनबद्धक । त्यांसी इहलोकीं नाहीं सुख ।

धनरक्षणीं अतिदुःख । तें जातां देख प्राणान्त ॥७५॥

धनागमनीं अतिकष्ट । धनरक्षणीं कलह श्रेष्ठ ।

धननाशें होय हृदयस्फोट । इहलोकीं कष्ट धनलोभ्या ॥७६॥

यापरी इहलोकीं दुःख । अधर्में खुंटला परलोक ।

मरतां उरीं आदळे नरक । आवश्यक धनलोभ्या ॥७७॥

जो धर्म करीना स्वयें न खाये । जो मजसारिखा कदर्यु होये ।

त्यासी चढतें वाढतें दुःख पाहें । नाहीं सुखसोये कदर्या ॥७८॥;

लोभाची वस्ती जिये ठायीं । तेथ स्वप्नींही सुख नाहीं ।

लोभ अतिशयें निंद्य पाहीं । तें आपण स्वमुखेंही सांगत ॥७९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel