कस्मात्संक्लिश्यते विद्वान् व्यर्थयाऽथहया सकृत् ।
कस्यचिन्मायया नूनं लोकोऽयं सुविमोहितः ॥२६॥
येथ अज्ञानाची कोण गती । जे अर्थ अनर्थी म्हणती ।
तेही अर्थार्थी होती । ज्ञाते भ्रमती अर्थासी ॥१९॥
ऐसे भ्रमले जे सज्ञान । तेही अर्जावया धन ।
युक्तायुक्त प्रयत्न । अनुदिनीं जाण स्वयें करिती ॥४२०॥
सज्ञान भ्रमावया कारण । ईश्वराची माया पूर्ण ।
अघटघटी जीचें लक्षण । त्या धनी सज्ञान मोहिले ॥२१॥
कृष्णमाया मोहिले पंडित । नव्हे म्हणाल हा इत्यर्थ ।
ते जोडिताति अर्थ । निजसुखार्थ भोगेच्छा ॥२२॥;
भोगांमाजीं जे म्हणती सुख । ते जाणावे केवळ मूर्ख ।
येच अर्थींचा विवेक । कदर्यु देख बोलत ॥२३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.