यदेतरौ जयेत्सत्त्वं भास्वरं विशदं शिवम् ।

तदा सुखेन युज्येत धर्मज्ञानादिभिः पुमान् ॥१३॥

समूळ फळाशा त्यागूनी । निर्विकल्प निरभिमानी ।

जो लागे स्वधर्माचरणीं । तैं रज तम दोनी जिणे सत्व ॥५॥

जैं भाग्याचें भरण उघडे । तैं हरिकथाश्रवण घडे ।

मुखीं हरिनामकीर्ति आवडे । तेणें सत्व वाढे अतिशुद्ध ॥६॥

कां दैवें जोडिल्या सत्संगती । श्रवणीं श्रवण लांचावती ।

वाचा लांचावे नामकीर्ती । अतिप्रीतीं अहर्निशीं ॥७॥

ऐसऐशिया अनुवृत्ती । रज तम दोनी क्षीण होती ।

सत्व वाढे अनुद्वेगवृत्तीं । त्या सत्वाची स्थिति समूळ ऐक ॥८॥

भास्वरत्वें प्रकाश बहुळ । विशदत्वें अतिनिर्मळ ।

शिव म्हणिजे शांत सरळ । हें सत्वाचें केवळ स्वरुप मुख्य ॥९॥

हे सत्वाची सत्ववृत्ती । आतुडे ज्या साधकाहातीं ।

ते काळींची पुरुषस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥२१०॥

तैं विवेकाचें तारुं आतुडे । वैराग्याचें निजगुज जोडे ।

सर्वेंद्रियीं प्रकाश उघडे । शिगे चढे स्वधर्म ॥११॥

ते काळीं जन अधर्मता । गर्व अभिमान असत्यता ।

बलात्कारेंही शिकवितां । न करी सर्वथा अधर्म ॥१२॥

निकट असतां दुःखसाधन । सात्विक सदा सुखसंपन्न ।

बलात्कारें क्षोभवितां मन । सात्विक जाण क्षोभेना ॥१३॥

ऐशिया निजसत्व दृष्टी । सुख सुखा येतां भेटी ।

त्यासी स्वानंदें कोंदे सृष्तीं । शुद्ध सत्वपुष्टी या नांव ॥१४॥

ऐसें विशद सत्व जयांपाशीं । शमदम सेविती तयांसी ।

वैराग्य लागे पायांसी । शुद्ध सत्वराशी ते उद्धवा ॥१५॥;

तैसेंचि सत्व तम जिणोन । जैं वाढे गा रजोगुण ।

तैं राजसाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि सांगे ॥१६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel