एतद्वदन्ति मुनयो, मुहुर्निःश्रेयसं नृणाम् ।
नारदो भगवान् व्यास, आचार्योऽङिगरसः सुतः ॥२॥
पूर्वी वेदविचारनिष्ठ । सुरवर्य मुनिश्रेष्ठ ।
हेंचि अनुवादले स्पष्ट । अतिवरिष्ठ विवेकी ॥१८॥
पूजाविधान प्रसिद्ध । बोलिला देवर्षि ’नारद’ ।
अंगिराचा पुत्र अगाध । ’देवगुरु’ प्रबुद्ध हेंचि बोले ॥१९॥
जो ’व्यास’ सत्यवती सुत । जो कां नारायण मूर्तिमंत ।
जेणें प्रकट केला वेदार्थ । जो विख्यात महाकवि ॥२०॥
पुराणकविकर्ता तो साङग । यालागीं ’व्यासोच्छिष्टमिदं जग’ ।
तेणेंही भगवत्पूजामार्ग । हा क्रियायोग बोलिजे ॥२१॥
असो इतरांची चावटी । जो पितामह सकळ सृष्टी ।
जो जन्मला विष्णूच्या पोटीं । तेणेंही या गोष्टी दृढ केल्या ॥२२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.