पूर्वं स्नानं प्रकुर्वीत, धौतदन्तोऽङगशुद्धये ।
उभयैरपि च स्नानं,मन्त्रैर्मृद्रहणादिभिः ॥१०॥
मळत्याग दंतधावन । यथाकाळीं करुनि जाण ।
देहशुद्धयर्थ करावें स्नान । मृत्तिकाग्रहण पूर्वक ॥८७॥
ऐसें झालिया मळत्यागस्नान । मग करावें मंत्रस्नान ।
वैदिक तांत्रिक विधान। दीक्षाग्रहण यथाविधि ॥८८॥
जैसा सद्गुरुसंप्रदावो । तैसा चालवावा आम्नावो ।
त्या विधीं स्नान करुनि पाहा हो । निर्मळ भावो धरावा ॥८९॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.