शुचिः सम्भृतसम्भारः, प्राग्दर्भैः कल्पितासनः ।
आसीनः प्रागुदग्वाऽर्चेदर्चायामथ संमुखः ॥१९॥
करुनि मलस्नान आपण । वैदिक तांत्रिक मंत्रस्नान ।
सारुनि नित्यविधान । ’शुचित्वपण’ या नांव ॥६४॥
मग देवपूजासंभार । शोधूनि करावे पवित्र ।
यथास्थानीं पूजाप्रकार । गंधादि उपचार ठेवावे ॥६५॥
श्वेतकंबल चैलाजिन । पूर्वदर्भाग्रीं आसन ।
पूर्वामुख बैसावें आपण । अथवा जाण उदङ्मुख ॥६६॥
स्थावरमूर्ती पूजितां देख । आसन करावें मूर्तिसंमुख ।
हा आसनविधि निर्दोख । पूजान्यासादिक हरि सांगे ॥६७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.