कृतन्यासः कृतन्यासां, मदर्चां पाणिना मृजेत् ।

कलशं प्रोक्षणीयं च, यथावदुपसाधयेत् ॥२०॥

विधियुक्त घालूनि आसन । गुरुसी करावें नमन ।

परमगुरु-परमेष्ठीसी जाण । करावें अभिवंदन अतिप्रीतीं ॥६८॥

जो मंत्र प्राप्त आपणांस । त्या मंत्राचे देहीं करावे न्यास ।

मंत्रमूर्ति आणोनि ध्यानास । पूजा ’मानस’ करावी ॥६९॥

जे मूर्ति आली ध्यानासी । तेचि आणावया प्रतिमेसी ।

हातीं धरोनिया अर्चेसी । करावें न्यासासी प्रतिमाअंगीं ॥१७०॥

कलश आणि प्रोक्षणी जाण । साधावीं यथाविधान ।

जळें करोनिया पूर्ण । दूर्वादि चंदन द्रव्ययुक्त ॥७१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel