नन्दं सुनन्दं गरुडं, प्रचण्डं चण्डमेव च ।
महाबलं बलं चैव, कुमुदं कुमुदेक्षणम् ॥२८॥
नंद सुनंद देवापाशीं । गरुड सदा तिष्ठे दृष्टीसी ।
चंड प्रचंड दोनी बाहींसीं । अहर्निशीं तिष्ठती ॥६३॥
बळ आणि महाबळ । सुमुख संज्ञें अवधानशीळ ।
कुमुद कुमुदाक्ष केवळ । पाठीसी प्रबळ बळें उभे ॥६४॥
गरुड दृष्टीं तिष्ठे आपण । येर नंदादि जे अष्टौ जन ।
ते अष्टौ दिशांप्रति जाण । पार्षदावरण हरिनिकटीं ॥६५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.