शिरो मत्पादयोः कृत्वा, बाहुभ्यां च परस्परम् ।
प्रपन्नं पाहि मामीश, भीतं मृत्युग्रहार्णवात् ॥४६॥
मस्तक माझ्या चरणांवरी । उभय बाहु परस्परीं ।
दोनी चरण दोंही करीं । धरी निर्धारीं भावार्थें ॥५५॥
संसारसागराच्या पोटीं । मृत्युग्रहें घातली मिठी ।
चरणीं लागलों उठाउठीं । मज जगजेठी सोडवीं ॥५६॥
भवभयें भ्यालों दारुण । यालागीं तुज आलों शरण ।
निवारी माझें जन्ममरण । भावें श्रीचरण दृढ धरिले ॥५७॥
तूं स्वामी असतां शिरीं । मज मृत्यु बापुडें केवीं मारी ।
भावें लोटांगण चरणांवरी । कृपा उद्धरीं कृपाळुवा ॥५८॥
देखोनि साष्टांग नमन । ऐकोनि भयभीतस्तवन ।
मज तुष्टला नारायण । ऐसें आपण भावावें ॥५९॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.