एवं क्रियायोगपथैः, पुमान्वैदिकतान्त्रिकैः ।
अर्चन्नुभयतः सिद्धिं, मत्तो विन्दत्यभीप्सिताम् ॥४९॥
एवं क्रियायोगलक्षण । वैदिक तांत्रिक मिश्र जाण ।
आगमनिगम विस्तार गहन । तो मुख्यार्थ पूर्ण सांगितला ॥७३॥
येणें क्रियायोग भजनमार्गें । भक्त जैं भोगमोक्ष मागे ।
तैं उभय सिद्धी लागवेगें । म्यां श्रीरंगें अर्पिजे ॥७४॥
भक्त निष्काम अनन्यभक्ती । तैं भोग मोक्षादि संपत्ती ।
घेऊनियां मी श्रीपती । त्यांच्या द्वाराप्रती सदा तिष्ठें ॥७५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.