अर्थे ह्याविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते ।

ध्यायतो विषयानस्य, स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥१३॥

सत्यार्थ नसतांही संसार । निवर्तेना अतिदुर्धर ।

येचि अर्थींचा विचार । निजनिर्धार अवधारीं ॥६२॥

वंध्यापुत्राचिया ऐसें । संसारा सत्यपण नसे ।

सत्य म्हणों तरी हा नासे । काळवशें सहजेंचि ॥६३॥

संसार जैं सत्य होता । तैं ब्रह्मज्ञानेंही न नासता ।

हा संतासंत नये म्हणतां । अनिर्वाच्य कथा पैं याची ॥६४॥

अविचारितां याचें कोड । अविवेकें हा अतिगोड ।

विषयध्यानें वाढे रुढ । संकल्प सदृढ मूळ याचें ॥६५॥

हा नसतचि परी आभासे । निद्रिता स्वप्नीं अनर्थपिसें ।

तेवीं संसार मायावशें । विषय आभासें भोगवी ॥६६॥

जंव जंव विषयसेवनें भवबंधन । जीवासी झालें दृढ पूर्ण ।

तैं जीवन्मुक्तासी विषयभान । दैवयोगें जाण दिसताहे ॥६८॥

’जीवन्मुक्तासी विषयप्राप्ती । तेणें बुडाली त्याची मुक्ती’

ऐशी आशंका न धरीं चित्तीं । तेंचि श्रीपति विशद सांगे ॥६९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel