ईक्षयाऽलकनन्दाया, विधूताशेषकल्मषः ।

वसानो वल्कलान्यङग, वन्यभुक् सुखनिस्पृहः ॥४२॥

करुनि अलकनंदेचें स्नान । करावें विध्युक्त तीर्थविधान ।

मग तेथें वसावें आपण । वसतें लक्षण तें ऐक ॥२१॥

त्यजूनि वस्त्रें आपण । करावीं वल्कलें परिधान ।

करुनि वनफलें भोजन । रहावें आपण अनुद्वेग ॥२२॥

आपुली पूर्ण निःस्पृहता । दावावी लोकसंग्रहार्था ।

निजसुखें तुज तेथें असतां । द्वंद्वसहिष्णुता दावावी ॥२३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel