पितरः सिद्धगन्धर्वा, विद्याधरमहोरगाः ।
चारणा यक्षरक्षांसि, किन्नराप्सरसो द्विजाः ॥२॥
अर्यमादि पितर येती । कपिलादि धांवती महासिद्ध ॥२४॥
आले गंधर्व विद्याधर। यक्ष चारण किन्नर ।
बिभीषणादि राक्षस थोर । वेगीं श्रीधर पाहों येती ॥२५॥
पहावया श्रीरंग । आले पाताळींचे पन्नग ।
ज्यांतें म्हणती महोरग । तेही सवेग पैं आले ॥२६॥
द्विज आले दत्तात्रेयादिक । नारद पाहों आला कौतुक ।
द्विज-पक्षी गरुडप्रमुख । सत्वर देख ते आले ॥२७॥
रंभा उर्वशी मेनका । अप्सरा ज्या अष्टनायिका ।
श्रीकृष्णदर्शना आवांका । धरोनि देखा त्या आल्या ॥२८॥
श्रीकृष्णस्वरुप पहावया । नयनीं थोर घेतला थाया ।
यालागीं देवसमुदाया । येणें लवलाह्यां जाहलें एथें ॥२९॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.