श्रुत्वा सुहृद्वधं राजन्नर्जुनात्ते पितामहाः ।
त्वां तु वंशधरं कृत्वा, जग्मुः सर्वे महापथम् ॥२६॥
निजधामा गेला श्रीपती । अर्जुनें सांगतां धर्माप्रती ।
तुज राज्य देऊनि परीक्षिती । लागले महापंथीं तत्काळचि ॥९८॥
निजधामा गेला श्रीकृष्ण । ऐकतां कुंत्या वनीं सांडिला प्राण ।
द्रौपदीसहित पांचही जण । महापंथीं जाण निघाले ॥९९॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.