एका मनुष्याचा आवाज अगदी खराब होता. परंतु त्याची गाणे शिकण्याची जागा चांगली सजवलेली होती. तेथे बसून तो आपला गाण्याचा अभ्यास करीत असे. एकदा त्याला वाटले की आपण आता छान गातो तेव्हा आपल्या गाण्याचा जाहीर कार्यक्रम करावा. त्याने जाहिरात देऊन आपले गाणे नाटकगृहात ठरविले. जाहिरात वाचून पुष्कळ लोक नाटकगृहात आले. परंतु, गाणे इतके भिकार झाले की लोकांनी टाळ्या पिटून आणि काठ्या बडवून त्याची हुर्यो केली व त्यास हाकलून लावले.
तात्पर्य
- आपल्या गुणांची किंमत आपणच ठरविणे हा मूर्खपणा होय. लोक जेव्हा त्या गुणांची तारीफ करतील तेव्हाच तो गुण खरा आहे असे समजावे. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.