एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे.
असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खांचखळग्यांचा होता. त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला.
तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले, 'अरे, दुष्ट माणसा, हे सगळं नुकसान तुझ्याचमुळे झालं. तू जर मला नीट खाऊ घातलं असतंस तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे ओझं मी सहज उचलू शकलो असतो.'
तात्पर्य
- काही लोक कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासही कमी करीत नाहीत. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.