एकदा एका डोमकावळ्याला असे वाटले की आपण राजहंसाप्रमाणे पांढरे शुभ्र व्हावे. राजहंस पाण्यात राहतो आणि पाण्याने अंग नेहमी धुतो तसेच आपण करावे म्हणून त्याने राजहंसाप्रमाणे पाण्यात राहण्यास सुरुवात केली. परंतु, पाण्यात राहून त्याचा रंग तर बदलला नाहीच पण लवकरच थंडी झाल्याने तो मरण पावला.
तात्पर्य
- नैसर्गिक गोष्टींत बदल करण्याचा प्रयत्न निष्फळच ठरतो. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.