एकदा ससे आणि गरुड यांच्यात भयंकर लढाई चालू होती. तेव्हा गरुडांचा पाडाव करण्याच्या कामी कोल्ह्याची मदत घेण्याचे सशांनी ठरविले. तशी त्यांनी कोल्ह्यांना विनंती केली. सशांचे सामर्थ्य किती आहे त्याचा विचार न करता ते मूर्ख कोल्हेही मदत करण्यास तयार झाले. थोड्याच वेळात गरुडांनी सशांबरोबरच कोल्ह्यांचाही पराभव केला.

तात्पर्य

- भांडणार्‍या दोन पक्षांचे बल पाहिल्याशिवाय त्यांच्या भांडणात कधी पडू नये.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel