एकदा दोन गृहस्थ एका होडीत बसून जलपर्यटन करीत होते. ते एकमेकांचे अगदी कट्टर शत्रू होते. आणि दोघे होडीच्या दोन टोकाला बसले होते.
काही वेळाने अचानक मोठे वादळ सुटले व आता ती होडी बुडणार असे दिसू लागले, तेव्हा त्या दोघांपैकी एकाने खलाशाला विचारले, 'गलबताची कुठली बाजू प्रथम बुडेल असं तुला वाटतं?'
खलाशाने उत्तर दिले, 'दुसरी बाजू'
तो गृहस्थ म्हणाला, ' चला, बरं झालं. माझ्या देखत माझ्या शत्रूचं मरण मला पहायला मिळेल.'
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.